Ukhane : नवरीचे लग्नातील उखाणे मराठी मध्ये | Bride's wedding vows in Marathi

 


वरीच्या आवडीचे लग्नातील उखाणे

 

 

Navriche-ukhane-Marathi
Navriche-ukhane-Marathi

मेंदी रंगते हाती,

वीडा रंगतो ओठी,

.......... रावांच नाव घेते तुमच्यासाठी

 


मेंदी रंगते हाती

वीडा रंगतो ओठी,

.......... रावांच नाव घेते तुमच्यासाठी

 


"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,

.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"

 


कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात

..........-- रावांचे नाव घेते माझ्या मनात



काचेच्या बशित बदामचा हलवा

.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा

 

shankarachi-marathi-ukhane
shankarachi-marathi-ukhane


काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन

..........-रावाचे नाव घेते सर्वांचा मान राखुन

 

 

कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,

..... आहेत माझे पूर्व संचित

 


कुरुंदाची सहन चंदनाचे खोड

..........रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड .

 


केले देते सोलून पेरू देते चिरून,

..........रावांच्या नावांचे कुंकू लावते कोरून

 


कोणत्याही रुढी परंपरेत आहे विज्ञानचे धागेदोरे,

...........सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

 

Angle-vows
Angle-vows


कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास

मि देते ...... ला श्रीखंड चा घास

 


गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद

..........-- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात

 


ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडि

सुखि ठेवा गजानना -- चि जोडि

 

 

गणेशा च्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात..

गणेशाला स्मरून करू विघ्नावर मात

.........._ रावांची साथ लाभली,

...... सून बनून आले मी ह्या घरात

 


गर्द आमराई त्यामध्ये पोपटाचे थवे,

..........चे नाव माझ्या ओठी यावे

 


गिरजा शंकर सीता राम यांना गुरु करू ,

..........राव आपण दोघे संसारसागर तारू

 

Navriche-ukhane
Navriche-ukhane


गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,

.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

 


गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज

..........-- रावांच्या बाळाची आज आहे मौंज

 


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट

..........-- नाव घेते सोडा माझी वाट

 


ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे

..........- नाव घेते सौभाग्य माझे

 

best-marathi-ukhane-for-male
best-marathi-ukhane-for-Female


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,

..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर

 


गृहिणी सजीव सखी प्रिय शिष्या मी होईन,

.. .. .. मानस सरोवरी सहस्त्र कमळे फुलवीन

 

 

घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,

प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून ...च्या घराची बेल

 


चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा

... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा

 


चंदनी पानात मुग्ध कळी हसली

..........रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

 

Navriche-Ukhane
Navriche-Ukhane


चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,

..........रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

 


चांदीच्या ताटात पक्वानांची रास

..........-- रावांना देते लाडूचा घास

 


चांदीच्या ताटात फणसाचे गरे ,

..........राव दिसतात बरे पिच्चारला नेतील तेवाच खरे

 


चांदी च्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा

......... च्या नावाने भरला हिरवा चुडा

 


चांदी च्या ताटात गाजराचा हलवा ,

.......... रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा

 

bridge-ukhana
bridge-ukhana


चांदी च्या तबकात तुपाच्या फूलवाती

...रावाच नाव घेते ...च्या राती

 


चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,

..... च्या बरोबर केली सप्तपदी

 

 

आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,

.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"

 

 

...... यांची लेक, झाले .... यांची सुन्

...........चे नाव घेते ग्रुह्प्रवेश करुन्.

 


..........-- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन

आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन

 

 

navariche-ukhane
navariche-ukhane

अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,

.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).

 

 

अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा

..........--रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

 

 

अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,

..... नी आणलीये सुगंधी वेणी.

 

 

अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली

..........-- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली

 

 

अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला अनमोल ग्रंथ गीता ,

…. .. चे नाव घेऊन येते मी आता

 

 

bridge-vows
bridge-vows

अस्सल सोने चोविस कँरेट

...................- अन माझे झाले आज मँरेज

 

 

आंनदाने भरला दिन हा लग्नाचा

..........-- रावांना घास देते गोड जिलेबीचा

 

 

आई वडील सोडताना, पाउल होतात कष्टी

.... रावांच्या संसारात करीन मे सुखाची सृष्टी

 

 

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा

..........-- रावांचा सहवास जन्मभर लाभावा

 

 

आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस

..........--राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस

 

 

navariche-ukhane
navariche-ukhane

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा

..........-- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

 

 

आज आहे श्रावणी पोळा,

..... च्या जीवावर शृंगार केले सोळा.

 

 

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,

....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी

 

 

आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण

..... रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकन

 

 

आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती,

....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती

 

 

lagnatil-ukhane
lagnatil-ukhane

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर

आयुष्याचा प्रवास करीन ..........-- रावांच्या बरोबर

 

 

आम्र वृक्ष मोहर्ल्याने लागते घ्रीश्माची चाहूल

.......... रावांच नाव घेवून टाकते पुढच पौउल

 

 

आशीवार्दाची फुले वेचते वाकून

...चे नाव घेते तुमचा मान राखून

 

 

आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद

..........-- चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद

 

 

इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर

...... नाव घेते .... ची सिस्टर

 

 

Navardevisathi-marathi-ukhane
Navardevisathi-marathi-ukhane

उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु..

...रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!

 

 

उभी होते मळ्यात,

नजर गेली खळ्यात,

गोड आवाजाचे सुर,

..........रावांच्या गळ्यात

 

 

एक दिवा दोन वाती

एक शिंपला दोन मोती

अशीच आनंदी राहु दे माझी व .............रावांची नाती गोती,

 

 

ओम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,

...रावांवर करते मी अमर प्रीती

 

 

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...

.. .. .. रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

 

 

Marathi--navriche-ukhane
Marathi--navriche-ukhane

कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,

..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद


 

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप

.......... रावां समवेत ओलांडते माप


 

जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले

.... रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले

 


जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,

......रावाच नाव घेते पत्नि या नात्याने

 


जशी आकाशात चंद्राची कोर

..... पती मिळायला माझे नशीब थोर

 

marathi-ukhane-makarsankrat
marathi-ukhane-makarsankrat


जाईच्या वेलीला आलाय बहार,

..... ना घातला २७ फेब्रुवारीला हार

 


जाईजुईचा वेल पस्ररला दाट

...बरोबर बांधली जिवनाची गाठ

 


जागतिक शांतिचे प्रतिक आहे कबुतर,

.... च्या सह शांतीने संसार करण्या पुजिते मी गॉरीहर.

 


जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते

सगळ्यांचा मान राखून नाव .... .. रावांचे घेते.

 


जीवन आहे एक अनमोल ठेवा,

...... आणतात नेहमी सुकामेवा.

 

Marathi-Ukhane-For-Female
Marathi-Ukhane-For-Female


जीवनात ही घडी अशीच राहू दे

..........-- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे

 


जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली,

....च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली

 


जेजुरीचा खंडोबा तुळ्जापुरची भवानी

....रावाची आहे मी अर्धागीनी

 


जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मिचा वास

.... रावांना भरविते श्रीखंडाचा घास


marathi-ukhane-for-female-bride
marathi-ukhane-for-female-bride



ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,

......सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.




झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी,

आयुष्यभर सोबत राहो .......... - .......... ची जोडी.





तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले,

आणि ...........नाथा मी तुज़ीच जाहले





तु्ळजा भवानीची  क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,

माहेरचे निरांजन आणि सासरची फूलवात

...... रावांचे नाव घेउन करते संसाराला सूरूवात





दान दागिन्यांनपेक्षा शब्द हवा गोड ,

..........रावांच्या संसाराला..........ची जोड





दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र

..........-- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र





दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार

दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार

ह्या सोहोळ्याला लागली तुम्हा सर्वांची उपस्थिती

 …….रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार






देवघ्ररात तेवतो नंदादिप समाधानाचा

.......... च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा



ukhana
ukhana




दैन्ंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व

…..रावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व





दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी,

........ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी





दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात

 ......साथि फुलेल आता सासरच्या वृंदावन






द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

...... .चे नाव घेते राखते तुमचा मान





द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

...चे नाव घेते राखते तुमचा मान


ukhana-2
ukhana-2




नजरेला नजर मिळवताना भाव प्रीतीचे उमगले,

…………..च्या दृष्टीने मी क्षणात मोहून गेले. 






नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा

..... .. रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा






नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी

तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी






नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती,

...... ची झाले आज मी सॉभाग्यवती.






नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर

..........-- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर



Ukhane-Marathi-Navriche
Ukhane-Marathi-Navriche




नांदा सौख्य्भरे दिला सगळ्यानी आशीर्वाद

......... चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद. 






नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद

..........तर आहेत माझ्या डाव्या खिशात






नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा

..........च नाव आहे लाख रुपये तोळा





नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू

.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू





निरभ्र आकाशात चंद्राचि कोर

.....च नाव घेते भाग्य माझे थोर्


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिक्रत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. क्रपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post

Contact Form