संपूर्ण भारत देश दुखाच्या गर्तेत, ओडिशात झाला सर्वात मोठा रेल्वे अपघात.
यासोबतच ओडिशा सरकारने शनिवारीचे सर्व कार्यक्रम रद्द करत राज्यात शोक
पाळण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातग्रस्तांना भरपाईची
रक्कम जाहीर केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत
जाहीर.
Coromandal-express-accident-view
तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात?
2 जून (शुक्रवार) संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस (बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस)
हावड्याकडे जात असताना अनेक डबे रुळावरून घसरले व ते बाजूच्या ट्रॅक वर उभ्या असलेल्या
मालगाडीला जाऊन धडकले. ही धडक एवढी भीषण होती की कोरोमंडल एक्स्प्रेस चे इंजिन थेट
मालगाडीच्या डब्यावर जाऊन बसले. कोरोमंडल एक्स्प्रेस चे काही डबे 3 नंबर च्या ट्रॅक वर जाऊन
पडले. त्या ट्रॅकवर शालिमार-चेन्नई सेंट्रल ही गाडी येत होती व या येणाऱ्या रेल्वेने घसरलेल्या डब्यांना
धडक दिली व ही धडक एवढी भीषण होती की सर्वात जास्त लोक या धडकेत मृत्यूमुखी पडले. हा
भीषण अपघात बालासोर जिल्ह्यातील बहाना बाजार स्थानकाजवळ घडला.
ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने अशी माहिती दिली की, मा. मुख्यमंत्री
नवीन पटनायक यांनी 3 जून रोजी संपूर्ण राज्यात राजकीय दुखवटा पाळण्यात यावा व कोणताही सन
साजरा करू नये असा आदेश दिला आहे.
घटणेचा विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक कर.
रेल्वेकडून अपघातानंतर हेल्पलाईन
नंबर प्रसिद्ध –
हावडा : 033 - 26382217
खडगपूर : 8972073925, 9332392339
बालासोर : 8249591559, 7978418322
शालीमार (कोलकाता) : 9903370746
मा. महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही ओडिशात झालेल्या रेल्वे अपघात
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाच्या दुखात सामील आहोत. त्यांनी मृत व्यक्तींना
भावपूर्ण श्रद्धांजली देत म्हणाले की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व कुटुंबाला दुःख सहन करण्याची
शक्ती देवो, अशी आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो. त्यांनी शनिवारी मध्यमाशी दिली ही प्रतिक्रिया.
Odisha Train Accident: सलाम तुमच्या कार्याला.! ओडिशा रेल्वे अपघातानंतर रक्तदान करण्यासाठी
हॉस्पिटलबाहेर रांगा
ओडिशातील बालासोर येथील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात
आहे.
नागरिकांनी रक्त देण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली याचा विडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या
लिंकवर क्लिक करा.
घटनास्थळाची व मदतकार्याची स्वतः ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव माहिती घेत आहेत. या घटनेच्या भीषण अपघातात अनेक लोक जखमी झाले.
सुरुवातीच्या वेळेस डॉक्टर यांना एवढी गर्दी लोक कशासाठी करत आहेत हे लक्षात आले
नाही पण नंतर त्यांना या गर्दी मागचे कारण समजल्यास त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला
व त्यांच्या असे लक्षात आले की, माणुसकी आणखी जीवंत आहे. जखमी व्यक्तीचा मोठ्या
प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्यामुळे
त्यांना बरे होण्यासाठी रक्ताची गरज आहे.
Blood-donate-train-Accident |
मृतांचा आकडा रक्त अभावामुळे वाढू नये म्हणून ओडिशतील लोकांनी मोठ्या
प्रमाणात रुग्णालयात रक्त देण्यासाठी गर्दी केली आहे. ओडिसा वासीयांच्या या
निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मृतांचा आकडा वेळ जाईल तसा वाढतच आहे
आतापर्यंत 288 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे व 1000 हून अधिक लोक जखमी झाले
आहेत.
हवाई दलाच्या खास हेलिकॉप्टरनं "मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी" हे ओडिशातील बालासोर जिल्ह्यात
घटनास्थळी दाखल झाले व झालेल्या भीषण ट्रेन अपघाताचा आढावा घेतला. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी
हे अधिकाऱ्याकडून सर्व घटनेची माहिती घेतली व त्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस
केली.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची पहाणी केशी केली ते पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक ला ओपेन
करा.
मृतांना पंतप्रधानाची मदत..
शुक्रवारीच्या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच मा. नरेंद्र मोदी यांनी ट्विटर द्वारे दुःख व्यक्त
केले आणि मी सतत अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांच्या संपर्कात असून सतत घटनेची माहिती घेत
आहे. मा. पंतप्रधान यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत व्यक्तीच्या घरच्यांना २ लाख तर
जखमींना ५० हजार रुपयांची मदतही जाहीर केली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी ग्वाही देखील
दिली आहे की, या घटणेसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल.
आज सकाळी ओडिशाचे मा. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी घटनास्थळाची पहाणी केली. स्वतः
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची भेट घेतली व मृतांच्या
नातेवाईकांना व जखमींना मदत देण्याची घोषणा केली.