काही
वेळा वाईट परिस्थितीत दररोज च्या पद्धतीने पैसे पाठवणे अशक्य/अवघड होते. अशा परिस्थितीत
पैसे पाठवता यावे यासाठी आरबीआय नवीन पेमेंट पद्धती व्यवहारात आणत आहे. ज्यामुळे मोबईल
मध्ये नेटवर्क नसतानादेखील आर्थिक व्यवहार पूर्ण करता यावे.
आरबीआय ची नवीन पेमेंट पद्धती | Lightweight Payment and Settlement Framework from RBI
लाईटवेट पेमेंट प्रणाली
नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारग्रस्त भागांत कमीतकमी साधनांच्या मदतीने काम करेल आणि अगदी सहज वापरकर्त्यांना पैसे पाठवण्यास मदत करेल. ही सुविधा कधी चालू होनार?
याविषयी मात्र आरबीआयनं अद्याप काहीही सांगितले नाही.
UPI, NEFT, and RTGS are examples of payment methods that may
be used. आरबीआयचं म्हणन्या नुसार, लाईटवेट पेमेंट
सिस्टम इंटरनेट आणि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या तंत्रांवर निर्भर राहणार नाही, म्हणजेच मोबाइल मध्ये "नेटवर्क आणि इंटरनेट ची सोय नसेलं तरीही या
सुविधेद्वारे तुम्ही पैसे पाठवू शकता".
RBI च्या वार्षिक अहवालात लाईटवेट प्रणालीचा उल्लेख
30 मे रोजी आरबीआय ने 2022-23 चा वार्षिक
अहवाल सादर केला आहे. या अहवालात आरबीआय ने लाईटवेट आणि
पोर्टेबल पेमेंट प्रणालीचा उल्लेख केला आहे. आरबीआय ने सादर केलेल्या अहवालात असे सांगितले आहे की,
ही पेमेंट
पाठवण्याची पध्दती कमीतकमी साधानांन च्या
(हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर) मदतीने काम करेल आणि ही प्रणाली फक्त अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच वापरली जाईल.
म्हणजेच, UPI आणि इतर RTGS, NEFT पद्धतीं सारखी, लाईटवेट पद्धतीं सर्वांसाठी बंद असणार आहे. UPI, NEFT, and RTGS are all forms of payment that can be
made.
आरबीआयचं म्हणण्यानुसार, ही पद्धतीं देशाची पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कोणत्याही
परिस्थितीत बंद पडू देणार नाही आणि
इकॉनमी लिक्विडिटी सातत्य टिकवून ठेवेल. ही पद्धती चालू झाल्यास अत्यावश्यक
पेमेंट सेवेत कोणताही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. वाईट परिस्थितीत अर्थव्यवस्था स्थिर
राहण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहारांमध्ये मदत करणं हाच या प्रणालीचा मागचा हेतु आहे.
आरबीआयनं आपल्या
स्टेटमेंटमध्ये म्हंटले आहे की, "युद्धाच्या वेळ प्रसंगी बंकर जशा पद्धतींने काम करतात, तसेच काहीससे काम ही पेमेंट पद्धतीं सिस्टममध्ये करेल.
यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डिजिटल पेमेंट पद्धतीं आणि आर्थिक
बाजारपेठेतील आवश्यक सुविधांवर
लोकांचा विश्वास अधिक द्रध होईल."
लाईटवेट प्रणाली UPI पेक्षा वेगळी कशी असेल?
सध्या भारतात पेमेंटचे
वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. UPI, NEFT, and RTGS are payment methods that may be used to send money. हे सर्व पर्याय/ पद्धतीं मोठे
व्यवहार करण्यासाठी सक्षम असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. हे कॉम्प्लेक्स/किचकट नेटवर्क आणि लेटेस्ट इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चरवर
आधारित आहेत. आरबीआयचं म्हणणे आहे की, माहिती आणि
दळणवळणाच्या पायाभूत सुविधांवर अत्यंत खराब परिस्थितीत
परिणाम होतो. त्यामुळे अशा वाईट परिस्थितीत
सध्याच्या UPI व इतर पेमेंट पद्धती काम करू शकत नाहीत. म्हणूनच अशा खराब परिस्थितीसाठी आपण तयार असणं गरजेचे आहे. त्यामुळेच नव्या प्रणालीचा/पद्धतीचा विचार करण्यात आला आहे आणि त्यावर काम चालू आहे.