Airtel चे सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना 'हा' मिनिमम रिचार्ज
प्लॅन वापरावा लागणार, कोणता आहे प्लान जाणून घ्या..
Airtel |
भारती एअरटेल ही देशातील
दुसरे सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर आहे. रिलायन्स जिओ नंतर एअरटेलने आपले ५ जी
नेटवर्क सुरू केले आहे. एअरटेलचे ५ जी नेटवर्क हे देशातील ३ हजार शहरांपेक्षा
जास्त शहरांमध्ये पोचले आहे.
एअरटेल ने Xstream फायबर ने ५G लॉंच केले आहे
व जिओ ने True 5G या नावाने लॉंच केले आहे. सध्या मार्केट मध्ये एयरटेल आणि जिओ एकमेकाचे स्पर्धक
आहेत.
Airtel-5G |
तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रीचार्ज प्लॅन्स
लॉन्च करत असते. अलीकडेच कंपनीने आपल्या मिनिमम रीचार्ज प्लॅन्सच्या किंमतीमध्ये
वाढ केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीमध्ये एअरटेलच्या मिनिमम रीचार्ज प्लॅनची
किंमत वाढली आहे. आज आपण या रीचार्ज प्लॅन बद्दल जाणून घेऊयात.
एअरटेल मिनिमम रिचार्ज प्लॅन २०२३
भारती एअरटेलने काही
दिवसांपूर्वी आपल्या रिचार्ज प्लॅनमधून ९९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला. ज्यांना
आपले सिमकार्ड अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर वापरकर्ते '९९ रुपयांचा' प्लॅनचा वापर करत
होते. मात्र आता तो ९९ रुपयांचा प्लॅन १५५ रुपयांचा झाला आहे. म्हणजेच सिमकार्ड अॅक्टिव्ह
ठेवण्यासाठी आता वापरकर्त्यांना १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन वापरावा लागणार आहे.
याबाबतचे वृत्त टेलिकॉम टॉक ने दिले आहे.
Bharati-Airtel-5G |
एअरटेलने आपला मिनिमम
रिचार्ज प्लॅन हा '१५५ रुपये' केल्यामुळे ग्राहकांना रिचार्ज करण्याचा खर्च वाढला
आहे.
एअरटेलचा १५५ रुपयांचा प्लॅन २४ दिवस
या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएससह एकूण 1GB डेटा मिळतो. फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक फ्रीचे अतिरिक्त फायदे आहेत. या प्लॅनची वैधता फक्त २४ दिवस आहे.
Airtel-155-Plan |
जर का तुम्हाला २८
दिवसांची वैधता असणारा प्लॅन हवा असेल तर तुम्ही १७९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता.
यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि २
जीबी डेटा मिळतो.