येथे पाहू शकता आपल्या नावारील चालू सीम-कार्ड sim-cards ची यादी.
आजच्या या
प्रगत तंत्रज्ञाच्या युगात प्रत्येकाजवळ दोन मोबाईल किंवा दोन मोबाईल नंबर आहेत. हे
असणे काही आजच्या काळात नवल नाही. पण यामुळे होणारे गैर व्यवहार, फसवणुका याच्या बातम्या
सरास सोशल मिडियावर पाहण्यास व ऐकण्यास मिळतात.
अशा होणाऱ्या विनाकारण
फावणुकीस आळा घालण्यासाठी हे पाहणे गरजेचे आहे की, आपल्या नावाने किती मोबाईल नंबर
sim-card रजिस्टर आहेत. काही वेळा आपल्याला माहीत ही नसते
की आपल्या नावाने कोणकोणते नंबर चालू आहेत व ते कोण आपले जवळचेच वापर करतात की आणखी
कोणी आपल्या नावाने गैरव्यवहार करतात. You can see how many sim cards are
in your name?
TOPCOP या सरकारी पोर्टल विषयी माहिती -
या सर्व अडचणीवर
मात करण्यासाठी भारत सरकारने एक असे संकेतस्थळ सुरू केले आहे की, तेथे समजेल आपल्या
नावाने किती नंबर चालू आहेत. त्या पोर्टल चे नाव आहे “साथी पोर्टल TAFCOP.”
साथी या पोर्टल
विषयी जाणून घेऊया, या पोर्टल ला चेक करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर व त्या नंबर वर
येणार OTP लागतो.
दूरसंचार
विभागाचे संचार साथी पोर्टल TAFCOP (फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक
संरक्षणासाठी दूरसंचार विश्लेषण) सेवा प्रदान करते ज्या देशभरातील मोबाइल
ग्राहकांसाठी प्रवेशयोग्य आहेत. वापरकर्त्याच्या नावाने जारी केलेल्या कनेक्शनची
संख्या शोधण्यासाठी, त्यांना फक्त त्यांचा "मोबाइल नंबर,
कॅप्चा आणि त्यांच्या मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी" प्रविष्ट करणे
आवश्यक आहे. वापरकर्ते कोणत्याही अनावश्यक किंवा अनधिकृत मोबाइल कनेक्शनची तक्रार
देखील करू शकतात.
तुम्हाला पण चेक करायचे असेल की तुमच्या नावाने किती नंबर सुरू
आहेत तर येथे क्लिक करा.
स्टेप-बाय-स्टेप ने कसे चेक करायचे ते पाहू :-
- सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- तुम्हाला भारत सरकारची दूरसंचार विभागाची साईट दिसेल.
Mobile-Number-detector-one-name |
- त्या साईट वर दहा अंकी मोबाईल नंबर टाका.
- त्याखालील बॉक्स मध्ये वर दिलेला कॅपचा टाका.
- व्हॅलिडेट कॅपच्या वर क्लिक करा.
- OTP पाठवला आहे याचा मेसेज पॉपअप होईल.
- तुम्ही वर टाकलेल्या नंबर आलेला OTP टाकून
लॉगिन बटन वर क्लिक करा.
- तुम्हाला पुढील टॅब मध्ये दिसून येईल की तुमच्या नावाने किती नंबर रजिस्टर आहेत.
- त्यातील जे नंबर तुमचे आहेत त्या नंबर पुढील बॉक्स ला क्लिक
करून समोरील पर्याय Required असा निवडू शकता.
- जर त्यातील एखादा नंबर तुम्ही वापरत नसाल तर Not Requird हा पर्याय निवडू शकता.
- शेवटी रीपोर्ट या बटन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा रीपोर्ट भारत दूरसंचार च्या माहिती विभागाला पाठवू शकता.
अशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल
व आमच्या वेळोवेळी येणाऱ्या नवीन माहिती साठी ALLOW या बटन ला क्लिक करा.