अवघ्या देशाचं आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मान्सून ची बातमी.
Mansoon-update-Biparjoy-Strome |
मान्सून पुढच्या पाच दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज होता पण, अरबी समुद्रात निर्माण
झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या मुळे मान्सूनची गती मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे परिणामी
शेतकरी वर्गाची चिंता आणखीनच वाढली आहे.
हवामान तज्ञ यांचे अंदाज -
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशन मध्ये रूपांतर झाले असून पुढील
24 तासात बिपारजॉय चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. या वादळामुळेच राज्यात पावसाचे आगमन उशिराने
होणार आहे. "16 जून नंतर मान्सून महाराष्ट्रात दाखल" होण्याची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात
आलेला आहे. या वादळामुळे संपूर्ण समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा
देण्यात आला. आहे. दरम्यान हे वादळ केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरात किनारपट्टीवरून पुढे सरकणार
आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील किनारपट्ट्यांना धोका नसल्याचेही सांगण्यात आलेला आहे.
Mansun-Map-Biparjoy-strome |
पंजाबराव डक यांच्या मते बीड जिल्ह्यात सात जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे आठ नंतर
जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख वर्तवली होतो.