शेतकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास पोषक वातावरण तयार झाले.
मान्सूनचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने, येत्या 48 तासांमध्ये मान्सून गोव्यामध्ये दाखल
होण्याचा मान्सून तज्ञांचा अंदाज. बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्ट्यां लगतच्यानं सतर्कतेचा इशारा. 14 जून नंतर चक्रीवादळाची तीव्रता
कमी होणार अशी माहिती हवामान खात्याची दिली आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण पावसाची
शक्यता. Mansun Update 2023.
Mansoon-Rain_Forcast |
अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
सध्या ते चक्रीवादळ मुंबईपासून ५६० किलोमीटर पश्चिम दिशेने प्रवास करते आणि
साधारणता वायूच्या दिशेने गुजरातकडे वाटचाल सुरू आहे. Mansun Today, बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटांनी थैमान घातले आहे. मान्सून कर्नाटक मध्ये मोठ्या प्रमाणात
सक्रिय झालेला आहे.
आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मान्सून महाराष्ट्रात
दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 17 जून पर्यंत मान्सून सर्व भाग व्यापून घेईल.
पूर्वेकडील समुद्रातील असलेल्या चक्रीवादळ किंवा अरबी समुद्रात असलेले चक्रीवादळ
या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची शक्यता. Mansun Update Maharashtra
ज्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वादळीवारासह पावसाची शक्यता
वर्तवण्यात आलेली आहे.
याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता
वर्तवण्यात आलेले आहे. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडासह हा पाऊस होऊ शकतो अशा
प्रकारचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील चांगला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचप्रमाणे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाचे
शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले आहे. "९ किमी तासाने बिपरजॉय चक्रीवादळ हे मार्गक्रमण करत आहे."
आज 11 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ हे 05:30 वाजता, ते अक्षांश 17.9
उत्तर आणि 67.4 पूर्व अक्षांश जवळ होते. ते 'मुंबईच्या पश्चिम नैऋत्येस सुमारे 580
किमी अंतरावर', पोरबंदरपासून 480 किमी दक्षिण-नैऋत्य, द्वारिकापासून
530 किमी दक्षिण-नैऋत्य, नलियाच्या 610 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि
कराचीपासून 780 किमी दक्षिणेस होते.
स्काय मेटचा हवामान अनंदाज -
पूर्व बिहार आणि लगतच्या भागात चक्रीवादळाचे संक्रमण झाले आहे. पूर्व बिहारपासून ओडिशापर्यंत हे बीपरजॉय चक्रीवादळ पसरले आहे. नैऋत्य बंगालच्या
उपसागरात चक्रीवादळाच्या हालचाली दिसून येत आहे.
बीपरजॉय चक्रीवादळामुळे
जोरदार वारे महाराष्ट्र
आणि गुजरात किनारपट्टीवर वाहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टीची स्थिती ही खूप भयानक असेल, वादळी वाऱ्या सोबत अति
खराब वातावरण असेल. गुजरातच्या
दक्षिण किनारपट्टीवर पाऊस येण्याची धडकण्याची अपेक्षा आहे.