राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
रायगड किल्ला शिवराज्याभिषेक सोहळा |
तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात उत्साहात साजरा. स्वराज्याच्या राजधानीत
रायगडावरती संभाजीराजांच्या हस्ते अभिषेक अडीच ते तीन लाख मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न
झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमींची तुफान गर्दी. शिवप्रेमींची गर्दी वाढल्याने
पोलिसांनी गर्दी पाहून संभाजीराज्यांकडे शिवप्रेमींना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्याची विनंती केली.
Shiv-Rajyabhishek-Din |
किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. अडीच लाखांपेक्षाही
जास्त शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल आणि काल रात्रीपासूनच शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झाले होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी राजे या कार्यक्रमाला जातीने लक्ष देऊन
आहेत आणि त्यातच मोठ्या संख्येने राज्यभरातून शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झाले होते.
रायगड शिवराज्याभिषेक CM-Dy.CM |
काही दिवसांपूर्वीच अर्थात दोन तारखेला (२-जून) तिथीनुसार राज्य सरकारने या राज्याभिषेक
सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व सोहळा पार पडला होता. त्यानंतर आज
तारखेनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आहे.
किल्ले रायगडावर मावळ्यांची गर्दी-
किल्ले रायगडावर मावळ्यांची तुफान गर्दी झाली, त्यामुळे अतिरिक्त मावळे उभारण्यास देखील वाव
नव्हता. जे मावळे गडाच्या पायथ्याशी उभे असतील त्यांनी तेथेच थांबून घ्यावे जेणेकरून कुणालाही नुकसान
होणार नाही. रायगड किल्ला हा रांगडा किल्ला आहे त्यामुळे मावळ्यांनी वर चढण्यासाठी काही गडबड करू नये
यापूर्वी येथे काही अनुचित घटना घडल्या आहेत.
raygad-gardi |
राज्याच्या विविध भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा केले गेला.
मुंबई येथील विमानतळावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. गल्लो-गल्ली
शिरायांच्या मावळयाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले व वंदन केले.
new-Rajwada-kolhapur |
कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात शाही पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
झाला. पहिल्यांदाच नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी
जोरदार तयारी केली होती. या कार्यक्रमाला छत्रपती घराण्यांनी देखील हजेरी लावली होती.
कसा झाला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्य -
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि एका
सार्वभौम स्वराज्य राज्याची घोषणा केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात
नवचैतन्याचा आनंदाचा सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा अत्यंत
व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती
शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. 'छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा'. राज्याच्या
कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात
आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज
म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला. Shivrajyabhishek Sohala age
Shivrajyaabhishek |
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर पासून
सुरू झाली होती. त्या वेळेस राज्याभिषेक ही नवीन संकल्पना होती त्यामुळे राज्यभिषेकासाठी निश्चित
अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आधार घेत आणि राजनीतीवर आधारित ग्रंथातून काही
विद्वान महंतानी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी देशातील
कानाकोपऱ्यातील ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सर्व लोक मिळून जवळपास एक लाखभर
लोक "रायगड" या ठिकाणी उपस्थितीत झाले होते. जवळपास चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम
व्यवस्था करण्यात आली होती. दररोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत
गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता, मावळे असे सर्वच
या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती
शिवाजी महाराज संस्कारित केल गेले.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जगत जननी
माता जिजाईना नमस्कार
केला. त्यांचे शुभ-आशीर्वाद
घेतले.