शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 2 जून 2023 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे.
महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी दिनांक 2 जून 2023 रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण सोडत/लॉटरी च्या यादीमध्ये ट्रॅक्टर, कडबा कटर, नांगर, पावर
टिलर, ऊस खोडवा कटर, पेरणी यंत्र इत्यादी अनेक कृषी अवजारांसाठी लाभार्थ्याची लॉटरी पद्धतीने
निवड करण्यात आलेली आहे.
MahaDBT_Farmers_Lottery |
सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झाली आहे त्यांनी
महाडीबीटी पोर्टलवर सातबारा होल्डिंग(ज्या घटकासाठी निवड झाली आहे त्याची प्रिंट) निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट
रिपोर्ट त्याच बरोबर यंत्रचलित
अवजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक अपलोड करावे.
कोणकोणत्या घटकांचा या योजने मध्ये समावेश आहे.
मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर्स स्कीम च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या लॉटरीच्या संदर्भात एक महत्त्वा चे अपडेट आहे.
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी
फार्मर स्कीमच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन, कृषी
यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा बी-बियाणे, खते, औषधे याचबरोबर अनुसूचित जाती जमाती साठी विशेष सहाय्य
योजना राबवल्या जातात आणि याच्यासाठी अर्ज केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांची सोडत लॉटरी झालेली आहे.
जे शेतकरी
लॉटरीमध्ये पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आपला सोडती मध्ये नंबर लागलेला आहे, आपण लॉटरीमध्ये पात्र झालेलो आहोत पुढील सात दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टलवर
कागदपत्रे अपलोड करावीत, अशा प्रकारे एसएमएस देऊन पात्र लाभार्थ्यांना
कळविण्यात आलेले आहे. त्यांनी लॉगिन केल्यानंतर अशा पात्र झालेल्या लाभार्थी च्या डॅशबोर्ड मध्ये विनर(Winner) असे दाखवत आहे. त्याचबरोबर
त्यांनी आपली कागदपत्रे अपलोड करावी अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या
माध्यमातून करण्यात आलेले आहे.
मित्रांनो जर आपली लॉटरी लागलेली असेल ज्याच्यामध्ये कृषी
यांत्रिकीकरण ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा ट्रॅक्टरचलित अवजारे असतील किंवा
इतर पेरणीचे अवजारे असतील कापणी यंत्र असेल फवारणी यंत्र असेल कडबा कुट्टी असेल
अशा बाबीसाठी जर लॉटरी लागली असेल त्यासाठी लागणारे टेस्ट रिपोर्ट कोटेशन आणि
आपल्या जमिनीचा सातबारा आणि व्यक्तीचे आधार कार्ड अशी जी कागदपत्रे आहेत पोर्टलवर
अपलोड करावे लागतील.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सिंचन साधने आणि सुविधा यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना शेततळे शेततळ्याचा अस्तरीकरण अशा बाबींसाठी लॉटरी लागलेली आहे. काही शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादनाच्या अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेल किंवा एकात्मिक उत्पादनाच्या अंतर्गत जे काही फळबाग लागवड किंवा फुल पीक लागवड आहे अशा बाबींसाठी ज्यांनी अर्ज केले होते.
mahadbt-lottery-farmer |
कांदा चाळ
असेल किंवा इतर काही बाबी असतील याच्यासाठी अर्ज केले होते त्याची देखील लॉटरी
लागली आहे. याच्या व्यतिरिक्त विशेष विभागांतर्गत काही योजना राबवल्या जातात, ज्याच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या
लाभार्थ्यांना नवीन विहीर जुन्या विहिरीचे दुरुस्ती अशी बाब राबवली जाते अशा
शेतकऱ्यांना देखील एसएमएस द्वारे कळवण्यात आली आहे.
MahaDBT-Farmer_Lottery |