शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा | Namo shetkari Mahasanman Nodhi Yojana GR Out.

 


शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीतून मिळणार वर्षाला १२००० आर्थिक मदत.

Namo-Shetkari-Yojana-GR
Namo-Shetkari-Yojana-GR

 

मित्रांनो राज्यातील पीएम किसान सन्मान निधीच्या वार्षिक सहा हजार रुपये मानधनासोबतच आता राज्य शासनाच्या माध्यमातून Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मानधन मिळण्याचे जवळजवळ निश्चित झालेला आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 15 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णयाच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान योजना ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र राहतील, याच्या पहिल्या हप्त्याचे वितरण कधी होणार आहे या सर्वांच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आज या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

 

2023 च्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेली घोषणा अशी की, वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य देण्यात यावे. हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर 15 June 2023 रोजी ही योजना राबवण्याकरिता महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.


या योजनेसाठीचे पात्र लाभार्थी आणि देरक्कमेचे निकष खालील प्रमाणे आहेत,


सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषांनुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस ग्राह्य धरले जातील.

पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेली पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.


namo-Shetkari-Yojana-Details
namo-Shetkari-Yojana-Details

 

नमो शेतकरी महा सन्मान योजना आणि केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेनुसार वेळापत्रकाप्रमाणे पात्र लाभार्थ्याच्या "बँक खात्यात थेट हे पैसे" आयुक्त कृषी यांच्यामार्फत वितरित करण्यात येतील.

 

कधी मिळणार Namo Shetkari MahaSanman Nidhi चे पैसे -


पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलैमध्ये, दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये आणि तिसरा हप्ता महे डिसेंबर ते मार्चमध्ये वितरित करण्यात येणार आहे. Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme GR.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आपण खाली दिलेला जीआर पाहू शकता. GR पाहण्यासाठी येथे click करा.

 

 

Namo-Shetkari-योजना
Namo-Shetkari-योजना 


    या दोन्ही योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वर्षाला १२००० रुपयाचे आर्थिक सहाय्य शासनाच्या मध्यानमातून केले जाणार आहे. त्यामुळे या योजणेमुळे सर्व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या योजनेचा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबाना याचा फायदा होणार आहे. 

https://drive.google.com/file/d/11cBTdsIs0HomCbryC9znjvzUYNGecgWX/view?usp=drive_link

To read the government GR please click on above link to read details about Namo Shetkari Scheme.

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिक्रत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. क्रपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post

Contact Form