शेतकऱ्यांसाठी आनंदाची
बातमी | या शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये| Namo Shetkari Yojana.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | या शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये| Namo Shetkari Yojana.
Namo-Shetkari-Yojana |
राज्यातील
शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला आज मंजूरी मिळणार आहे. आज राज्य मंत्री
मंडळाच्या बैठकीत ही मंजुरू देण्यात येणार आहे.
पीएम
किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.
मा. उप-मुख्यमंत्री/अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही योजना
घोषित केली आणि आता शेतकऱ्यांना वर्षाला केंद्र आणि राज्याचे मिळून एकूण १२ हजार रुपये
मिळणार आहेत.
Namo-Shetkari |
केंद्र
सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ हजार रुपये जमा करते त्याच प्रमाणे
राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये देणार आहेत. आणि एकूण ही रक्कम
१२ हजार इतकी असणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय?
ही योजना नेमकी काय आहे ते आपण पुढे पाहू,
- २. केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत मिळते.
- ३. केंद्र सरकारकडून दर ४ महिन्याच्या अंतराने २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
- ४. राज्य सरकार आता केंद्र सरकारच्या धर्तीवर ६ हजरांमध्ये आणखी ६ हजारांची भर घालणार आहे.
- ५. नमो शेतकरी महासन्मान योजणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.
- ६. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीयानाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ७. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबानाच मिळणार आहे.
- ८. बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.