अनुकंपा नियुक्तीसाठी भावाच्या जागी बहिणीचे नाव टाकण्यास परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय;
अनुकंपा नियुक्तीसाठी भावाच्या जागी बहिणीचे नाव टाकण्यास परवानगी.. |
नाशिकच्या तरुणीला दिलासा अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या भावाच्या जागी बहिणीचे नाव टाकता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
नाशिक येथील तरुणीने भावाच्या संमतीच्या आधारे अनुकंपा तत्त्वावरील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या जागी स्वतःचे नाव अंतर्भूत करण्यासाठी महापालिकेला विनंती केली होती. "अनुकंपा नियुक्तीसाठी भावाच्या जागी बहिणीचे नाव टाकण्यास परवानगी". महापालिकेने शासन निर्णयाचा (जीआर) संदर्भ देत तिची विनंती फेटाळली होती. तथापि, उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय चुकीचा ठरवत तरुणीला मोठा दिलासा दिला.
'Allowed to substitute name of sister in place of brother for compassionate appointment.'
नाशिक येथील शुभांगी कमोदकरने महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी नाशिक महापालिकेच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या जागी याचिकाकर्त्या तरुणीचे नाव टाकण्यास नकार देण्याचे कोणतेही वैध कारण आम्हाला दिसत नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने 'अनुकंपा तत्त्वावरील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षा यादीत शुभांगी कमोदकरचे नाव तिच्या भावाच्या जागी' टाकण्याची प्रक्रिया पुढील चार आठवडय़ांत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने महापालिकेला दिले.
अनुकंपा नियुक्ती GR
For Compassionate Appointment (अनुकंप नियुक्ती ) GR
शुभांगीचे वडील नाशिक महापालिकेत वरिष्ठ लिपिक म्हणून सेवेत होते. 21 एप्रिल 2014 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी नोकरीसाठी शुभांगीचा भाऊ गौरेशने अर्ज केला होता. नंतर 2018 मध्ये पदवीधर झालेल्या शुभांगीने भावाच्या संमतीने 5 जून 2021 रोजी सरकारी नोकरीसाठीच्या प्रतीक्षा यादीत भावाच्या जागी स्वतःचे नाव टाकण्याची विनंती नाशिक महापालिकेला केली होती.