बचत खात्यातील पैशाने पैसा कमावणे.
प्रत्येक व्यक्तीचे कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते असतेच आणि प्रत्येक व्यक्ती त्या खात्यात प्रत्येक महिन्याला काहीतरी पैसे जमा करत असतो.
प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की बँकेत फक्त FD या योजनेनेच आपल्याला व्याज मिळते. पण बँक हे सांगत नाही की, auto sweep या आपल्या खात्याच्या फेर बदलाने आपल्याला आपल्या खात्यातील पैशाचे बँकेला व्याज द्यावे लागते.
आपण जर आपल्या SBI च्या खात्याला
Auto Sweep या खात्यात बदलले तर प्रत्येक महिन्याला FD सारखे व्याज मिळेल. त्यासाठी आपण आपल्या SBI च्या बँकेत जाऊन एक आर्ज सादर भरून त्यांना देणे.
प्रत्येक बँकेचे वेगवेगळ्या नावाने ही सुविधा आहे, त्यातील काही बँकेचे खाली दिल्या प्रमाणे,
- SBI Savings Plus Account
- HDFC Sweeping Fixed Deposit
- ICICI Flexi Deposit
आपण एका उदाहरणाने समजू, आपण आपल्या खात्याला 10,000/- मर्यादेला Auto Sweep पर्याय निवडला तर 10,000/- वरील रक्कमेला व्याज मिळेल.
आपण आपले पैसे 7-14 दिवस ठेवले तर जवळपास 3.5% व्याज मिळेल. जेवढे दिवस पैसे त्या खात्यात राहतील तेवढ्या दिवसाचे व्याज बँक खात्यात जमा करते.
आपल्याला त्या पैशाची गरज पडल्यास लागतील तेवढे पैसे आपण काढू शकतो ते पण कोणतेही आतिरिक्त पैसे न देता. ही योजना प्रत्येक बँकेत आहे पण वेगवेगळ्या नावाने.
तर आजच आपल्या खात्याला Auto Sweep मध्ये बदला आणि अतिरिक्त पैशाचा फायदा घ्या.